Share

Bacchu Kadu | “ठाकरे-पवारांना जमलं नाही ते शिंदे-फडणवीसांनी केलं”, बच्चू कडूंकडून कौतुकाचा वर्षाव

Published On: 

Bacchu Kadu | मुंबई : दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा आज मुंबईत कॅबिनेटमध्ये झाली. यानंतर अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

याबाबत बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनाथांचेच नाही तर दिव्यांगांचे सुद्धा नाथ आहे. आमचा 20 वर्षांचा लढा त्यांनी वीस दिवसात पूर्ण केला. दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव ठाकरे व अजित पवारांकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी काम केलं नाही. तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी वीस दिवसात केलं. त्यामुळे दोघांचे लाख लाख आभार, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मागच्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला. यानंतर त्यांनी आता शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!