🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते वाटप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही खाते स्वत:कडे ठेवले नाही. त्यामुळे राज्याच्या इतिहासात त्यांचे नाव बिनखात्याचे मुख्यमंत्री म्हणून नोंदले जाईल, अशी टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, केवळ सत्तेच्या लालसेपोटी राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तालावर नाचत आहे, अशी घणाघाती टीका लोणीकर यांनी शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर केली आहे. सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करत आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, शिवसेनेचा वाघ आता वाघ राहिलेला नसून वाघाचे रुपांतर आता काँग्रेसच्या शेळीत झालेले आहे, असे म्हणत जोरदार टीकास्त्र बबनराव लोणीकर यांनी शिवसेनेवर सोडलं आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांवर देखील लोणीकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘सध्याचे सरकार स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक चांगल्या आणि जनहिताच्या योजनांना नवीन सरकारने स्थगिती देणे ही बाबही दुर्दैवी होय.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206418023319400448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206412381082927106?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
