Share

बीए, बीकॉम, बीएससी प्रथम वर्षाच्या परीक्षा बुधवारपासून

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ६ एप्रिलपासून सुरु झाल्या आहेत. बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षेची सुरुवात  बुधवारपासून होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परंपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरु झाल्या आहेत. तर ६ एप्रिलपासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षेस सुरुवात झाली आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्हयातील परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा होत आहेत. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्यांसाठी होम सेंटर असणार आहे.

तर ऑनलाईन परीक्षा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे परीक्षा देता येईल. परीक्षा केंद्रावर कोविंड संदर्भात उपाययोजना ‘फिजीकल डिस्टिन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्याची सूचना कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, एमसीए, बीटेक, एमटेक, एमफार्मसी, बीसीए, बीबीए, बीएसडब्ल्यू, बीकॉम ई – कॉमर्स, विधि, पत्रकारिता पदवी आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमासाठी ३८ नवीन केंद्र असणार अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली. या परीक्षेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी (७ हजार ५०१), तंत्रज्ञान (१ हजार ५८९), विधी (१ हजार ४१०), औषधनिर्माणशास्त्र (३ हजार ९२२) तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ५२१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!