Share

मनपाची वॉर्डावॉर्डात जाऊन पथनाट्याद्वारे जनजागृती; ‘कचरा अलग करो’

Published On: 

औरंगाबाद :भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.  लोक चळवळीतून शहराचे रूप पालटणार आहे. या महोत्सवात ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानाअंतर्गत ‘स्वच्छता’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या अंतर्गत सोमवारी (दि.२७) महानगरपालिकेच्या वतीने ‘कचरा अलग करो’ या विषयावर सर्व ९ झोन्समध्ये जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले.

औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आज घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या उपस्थितीत हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले.
सर्व १ ते ९ झोन मध्ये वाॅर्ड अधिकारी, स्वछता निरीक्षक यांनी नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण कसे करावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

झोन क्र. २ येथे स्थानिक लोक कलावंत यांच्या सहकार्याने सुंदर नगर, नागेश्वर वाडी,भोईवाडा व राधामोहन कॉलनी या ठिकाणी पथनाट्याद्वारे कचरा अलग करो याबाबत जनजागृती करण्यात आली. कलावंतांनी गायनाद्वारे सोप्या पद्धतीने नागरिकांना कचरा वर्गीकरण बाबत माहिती दिली. सुंदरनगर येथे उपायुक्त सौरभ जोशी व घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पथनाट्याद्वारे करण्यात येत असलेल्या जनजागृतीची प्रशंसा केली. या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. यावेळी वार्ड अधिकारी, स्वछता निरीक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!