उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. हा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून पुन्हा कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ज्या ठिकाणी फक्त चहा विक्री होतो, अशी सर्व हॉटेल, पान, तंबाखू, सिगारेट, तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या, सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, वसतीगृहे, खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्पोर्टस कॉम्पलेक्स, योगा क्लासेस, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल, लॉन्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही बंद राहणार आहे. दैनंदिन बाजारात सोशल डिस्टन्सींगचे पालन, गर्दीचे नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने संबंधित नगर पालिका, नगर पंचायत यांनी नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व फूड कोर्टस, उपहारगृहे यांना केवळ घरपोच सेवा देण्यास परवानगी असेल. चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी शासनाच्या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे.
सायं. ७ ते स. ७ या कालावधीत बंद पाळावा, मेळावे, सभेसाठी ही परवानगी असणार नाही. सायं. ७ ते पहाटे ५ या कालावधीत नगर पालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागु असेल. जिल्ह्यातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे स. ७ते सायं. ७ या कालावधीत सुरू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल’ तृणमूल नेत्याची खोचक टीका
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

