Share

स्वच्छ भारत अभियानात ‘औरंगाबाद’चा डंका; शिवसेना करणार सफाई कामगारांचा सत्कार!

Published On: 

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान मिशन तर्फे दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला जातो. मागील वर्षी सन २०२० मध्ये या स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार औरंगाबाद ८८ व्या स्थानावर होते आता सन २०२१ मध्ये शहर २२ व्या स्थानावर आहे. हे आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कार्य असून यामध्ये मनपा सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे याची जाण ठेवून शिवसेनेच्यावतीने या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

शहरी विकास मंत्रालय भारत सरकारमार्फत १९ नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहरांमध्ये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू करण्यात आले आहे. मलनिस्सारण वाहिनी, सेप्टीक टँक व मॅनहोल मध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करून घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा होता. औरंगाबाद महानगरपालिकेने मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात साफसफाई कर्मचाऱ्यांना ६ जानेवारी २०२१ मध्ये प्रशिक्षण दिले होते.

३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता शहरातील प्रत्येक वाॅर्डात या प्रभागातील वाॅर्डाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे त्या भागात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांचा सत्कार करणार आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी वार्डातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, अनिल पोलकर यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!