🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात दररोज दिड हजारांवर रुग्णसंख्या निघत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्मार्ट सिटी टीमकडून केलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात एकूण २६ कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी ८ भाग हे कोरोना संसर्गाचे बिग हॉटस्पॉट घोषित केले आहेत. तर मध्यम प्रकारात १२ आणि मायक्रो कन्टेनमेंट झोनमध्ये ६ भागांचा समावेश आहे.
वाढता संसर्ग पाहता शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपलमेंट कॉर्पोरेशन टीमकडून शहरातील कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले होती. एसएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, प्रकल्प सहायक व्यवस्थापक स्नेहा नायर यांच्या टीमने शहरातील ३७ आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वर्कर्सकडून ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे हे सर्वेक्षण पूर्ण केले. मागील वीस दिवसांत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात शहरातील सर्व भागांचा अभ्यासाअंती २६ वसाहती कंन्टेनमेंट झोन अर्थातच हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत.
तीन प्रकारात कंन्टेनमेंट झोनचे वर्गीकरण करून ते जाहीर केले आहेत. पहिल्या प्रकारात पंधरा पेक्षा जास्त आणि ५० पेक्षा कमी सक्रिय रूग्ण आहेत, अशा ६ वसाहती मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. तर ज्या भागात ५० पेक्षा जास्त आणि १०० पेक्षा कमी सक्रीय रूग्ण आहेत, अशा १२ भागांना मध्यम (मेडियम) कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर १०० पेक्षा अधिक रूग्ण असलेल्या ८ वसाहतींना लार्ज कन्टेनमेंट झोन (बिग हॉटस्पॉट) म्हणून रविवारी पालिकेने जाहीर केले.
१२ मध्यम कन्टेनमेंट झोन : देशमुखनगर, रेणुकानगर, बारावी योजना, झांबड इस्टेट-श्रेयानगर व क्रांतीचौक, विश्वरूप हॉल एरिया-उस्मानपुरा, शास्रीनगर, बालाजीनगर-रमानगर व शिवशंकर कॉलनीसह अरिहंतनगर, सिंधी कॉलनीय- बौद्धनगर व उत्तमनगर, हनूमाननगर, ज्योतिनगर परिसर-शहानुरमिया दर्गा, ज्ञानेश्वर कॉलनी- संजनगर व अंबिकानगर, एसटी कॉलनी-ठाकरेनगर.
६ मायक्रो कन्टेनमेंट झोन : नाथपुरम सोयायटी, आदित्य नगर, कासलीवाल विश्व, खिवंसरा पार्क, पुंडलिकनगर गल्ली-5, पुंडलिकनगर गल्ली-10, बिग हॉटस्पॉट असलेले ८ भाग, शिवाजीनगर : रामकृष्णनगर, काबरानगर, गारखेडा सिडको एन-९ : पवननगर, आंबेडकरनगर, शिवनेरी कॉलनी, किराडपुरा, सिडको एन-६ : मोतीवालानगर, एमजीएम परिसर, किराडपुरा उल्कानगरी : बौद्धनगर, उत्तमनगर, टिळकनगर, गारखेडा, कांचनवाडी : वॉर्ड क्रमांक-१०७ विटखेडा परिसर, ज्योतिनगर वॉर्ड : दशमेशनगर पुंडलिकनगर : गारखेडा परिसर, विद्यानगर, एन-२ मुकूंदवाडी : सिडको एन-३, जयभवानी नगर
महत्त्वाच्या बातम्या
- ‘100 कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन केला जातोय’
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- ‘जम्बाे’ लसीकरण मोहीमेत ‘मनपा’चा सावळा गोंधळ! अनेक ठिकाणी नागरिक आल्या पावली परतले
- ‘पोलिसच बॉम्ब पेरतायत आणि गृहमंत्री वसुली करतायत हे देशात पहिल्यांदाच पाहतोय’
- ‘नैतिकता फक्त देशमुखांकडेच, मुख्यमंत्र्यांची नैतिकता मीठी नदीत शोधायला लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
