Share

वसुलीत औरंगाबाद आरटीओ कार्यालय ठरले नंबर ‘वन’!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना काळात अनेकांना वसुलीसाठी मोठा फटका बसला आहे. मात्र यास औरंगाबाद आरटीओ कार्यालय अपवाद ठरले आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने १२० टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठल्याने आरटीओवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे. पाच महिन्यात औरंगाबाद येथील आरटीओ कार्यालयाने तब्बल अडीच कोटींचा पल्ला गाठल्याचे सांगितले जाते. राज्यात औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने मानाचे स्थान मिळवले आहे.

प्रभारी पदांवर कारभार सुरू असलेल्या औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने शासनाच्या वसुलीवर विशेष लक्ष दिल्याने सर्वाधिक म्हणजे तब्बल १२० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्टे गाठले आहे. राज्यशासनाच्या विविध विभागामध्ये आरटीओ कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा होतो. यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रत्येक आरटीओ कार्यालयाला उद्दिष्टे दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार विविधा वाहनांकडून वसूल केलेला दंड, वाहनांचा कर वसुलीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार प्रत्येक आरटीओ कार्यालयाकडून वसूलीसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून वसूलीवर भर दिला जातो.

औरंगाबाद आरटीओ हे मुख्य पद तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेले आहे. मात्र वर्षभरापासून या पदावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार हे पदभार सांभाळत आहेत. या शिवाय सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याचे ८३ हजार रुपयांची वसूली केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच महिन्यात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत  हि पदे रिक्त आहेत. असे असतानाही २ कोटी ६० लाख रुपयांची वसूली झाली आहे. वसूलीवर कार्यालयाने अधिक भर दिला. दोन वायुवेग पथकांच्या मार्फत वसूली करून उष्ट्ये साध्य केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!