🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यात भाजप-शिवसेना युती झाली असली तरी अनेक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. पश्चिम मतदरसंघाचे विद्यामन आमदार संजय सिरसाट यांच्या विरोधात मोठी नाराजी आहे. ही नाराजीचा फायदा भाजपचे अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना होण्याची शक्यता आहे. राजू शिंदे यांसाठी भाजपतर्फे छुप्पा पाठिंबा देण्यात येत आहे. एवढच नव्हे तर भाजपने आपली बुथ यंत्रणाही कामाला लावल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघात भाजप शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पश्चिम मतदारसंघ मागसवर्गीय वर्गासाठी राखीव आहे. यामूळे गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे संजय सिरसाट यांनी आपले वर्चस्व कामय ठेवले आहे. 2014 मध्ये युती तुटल्यानंतरही सिरसाट यांनी विजय खेचून आणला होता. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. या मतदारसंघाला खिंडार पाडण्याचे काम भाजपतर्फे करण्यात येत आहे. शिवसेनेशी नाराज असलेल्यांना जवळ करीत भाजपची यंत्रणा राजू शिंदेसाठी कामाला लावली आहे.
शुक्रवारी उल्कानगरी येथे माजी नगरसेवकांच्या घरी विशेष बैठक घेण्यात आली. त्याच बैठकीतून भाजपची बुथ यंत्रणा राजू शिंदेसाठी कामाला लावण्यात आली आहेत. यासह मराठा समाज,दलित समाजाला जवळ करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी मराठा समाजाचे नेते विनोद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसेच्या काही पदाकिधाऱ्यांनाही सोबत घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
राजू शिंदे यांनी यावेळी पुर्ण ताकत पश्चिम मतदारसंघातून लावली आहे. यामूळे आता मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकता हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी राजू शिंदे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय सिरसाट यांची डोकेदुखी बनले आहेत. राजू शिंदे विषयी भाजपकडे तक्रार करूनही ही कुठल्याच कारवाई करण्यात आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182617174277382144?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182617060838232064?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
