🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असून पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी दिली. रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची मुभा दिली जाणार असल्यामुळे या रुग्णांवर महापालिकेची बारीक नजर असेल असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. ही संख्या येत्या काही दिवसात आणखी वाढेल असे मानले जात आहे. कोरोना संसर्गाच्या या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने काय काय तयारी केली आहे याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. पांडेय म्हणाले, महापालिकेने पंधरा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना तो डोस प्राधान्याने देणे व ज्यांनी दोन्हीही डोस घेतले आहेत त्यांना तिसरा डोस देणे.
आभासी पध्दतीने कोरोनाबाधितांना वैद्यकीय सल्ला दिला जाईल, त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. त्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन कमांड सेंटर सुरु केले जाणार आहे, याठिकाणी आवश्यक ती यंत्रणा येत्या दोन-तीन दिवसात उभारली जाणार आहे. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी आवश्यक ती साधनसामुग्री अद्ययावत स्वरुपात तयार करुन ठेवणे, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेसोबत काम केले आहे, त्यांनाच पुन्हा संपर्क साधून गरजेनुसार त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाईल.
ऑक्सिजनची यंत्रणा सज्ज
महापालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे घाटी रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने प्रशिक्षण घेतले जाईल. महापालिकेचे दवाखाने, कोविड केअर सेंटर्स या ठिकाणी असलेली ऑक्सिजनची यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. ऑक्सिजन सिलिंडर आणि प्लांट भरलेला असेल याकडे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. महापालिकेकडे अकरा रुग्णवाहिका आहेत,त्या सज्ज ठेवल्या जातील. त्याशिवाय आणखीन गरज पडल्यास स्मार्ट बसचा उपयोग देखील रुग्णांच्या वाहतुकीसाठी केला जाईल. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांचे मनोधैर्य राखण्यासाठी पालिकेच्या कंट्रोलरुम मधून मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील भाजप मंत्र्यांच्या राजीनामा सत्रावर शरद पवार म्हणाले, “गोव्यातही हे…”
- ‘मराठीत फलक लावल्याने काय होणार?’; अभिनेता सुमित राघवनचा प्रश्न
- छत्रपती शिवरायांचे दर्शन होणार; स्वारी लवकरच संभाजीनगरला धडकणार, आ. अंबादास दानवेंनी दिली माहिती
- “दीदींच्या प्रकृतीत सुधारणा.. ; बहीण आशा भोसले यांनी दिली प्रतिक्रिया
- ‘मला जबाबदारीतून मुक्त करा’; पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफांचं वक्तव्यं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
