Share

चिंता वाढली : औरंगाबादेत 24 तासात 7 नव्या रुग्णांची नोंद

Published On: 

मुंबई : कोरोना रुग्णांची महाराष्ट्रातील एकूण संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. काल दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 117 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात 957 रुग्ण बरे झाले आहेत.

तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासात औरंगाबादमध्ये 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिलांवर औरंगाबादेतील मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच दुसरीकडे मात्र दिलासादायक बातमी म्हणजे औरंगबादेतील 6 पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांना त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सतत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आजपर्यंत 1 लाख 2 हजार 189 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 6 हजार 817 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!