Share

जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश

Published On: 

औरंगाबाद : चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने मंगळवारी (दि. 2) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संकुलाच्या जागेची पाहणी केली. यावेळी संकुलाच्या जागेची सीमा निश्चित करून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना नोटीस देत अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, पोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, तहसीलदार एस.एन. लाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, तलाठी विशाल मगरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चिकलठाणा येथील गट क्रमांक 216 व 217 मधील एकत्रित 14.96 हेक्टर म्हणजेच जवळपास 37 एकर गायरान जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या नैसर्गिक जलस्त्रोताचा संकुल उभारण्यात उपयोग करावा. त्याच बरोबर हे संकुल सर्व सोयीसुविधायुक्त परिपूर्ण आणि उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!