Share

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला मात्र ‘हे’ होणार सुरु

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने अनलॉक-3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या गाईडलाइंसमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता राज्य सरकारनेही 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे. राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईनुसार मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होमडिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. मात्र, राज्य सरकारच्या जून महिन्यातील आदेशाप्रमाणेच इतर सर्व नियम लागू असणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहेच.

नुकतंच केंद्र सरकारने ‘अनलॉक 3’ च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक 3 च्या नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी 5 ऑगस्टपासून जिम सुरु करता येणार आहे. मात्र त्यांना कडक नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

राज्यात काय होणार सुरु

मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी

5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत मॉल आणि मार्केट सुरु होणार

मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणार

ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगी

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री पुण्याच्या दिशेने रवाना…

सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार

अनावश्यक सेवेती ज्या दुकानांना याआधी परवानगी देण्यात आली होती तेदेखील सुरु राहतील.

टॅक्सी, कॅब,चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 3, रिक्षा – चालक + 2, दुचाकी – चालक + 1

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – भुजबळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!