Share

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – भुजबळ

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मौजे सोनेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणाची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्नधान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलिसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या तांदळाच्या काळा बाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राजेश टोपेंचा मोठा निर्णय, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!