Share

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री पुण्याच्या दिशेने रवाना…

Published On: 

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोनाने मुंबई पाठोपाठ पुण्यातही कहर घातला असून पुण्यातील आकडे हि अजून आटोक्यात नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून समजत आहे. आता केंद्राचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे स्वतः लक्ष घालून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष घालणार आहेत. तर, मुख्यमंत्री देखील याच पार्श्वभूमीवर आज पुणे दौऱ्यावर आहेत.

मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याला रवाना झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली आहे. पुण्याला जाण्यासाठी ते स्वत: गाडी ड्राईव्ह करत आहेत. आदित्य ठाकरे नेहमी जी गाडी वापरतात ती गाडी आज मुख्यमंत्री स्वत: चालवत असल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री आज सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला निघतील. कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत कोरोनाविषयक बैठकाही घेणार आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 12.15 वाजता त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल.

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजाराची ‘सीआयडी’मार्फत चौकशी – भुजबळ

त्यानंतर दुपारी 2.30 वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल. या बैठकांना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुख्य सचिव संजय कुमार तसंच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. मग संध्याकाळी पाच वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचणार आहेत. दुपारी 12.15 वाजता ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या कोरोना लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर 2.30 वाजता ते प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीला हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, कोरोना आढावा बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजेरी लावणार आहेत. चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे एकाच बैठकीला हजेरी लावणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. यावेळी पाटील प्रश्नांचा भडीमार करण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!