Share

‘जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील’ – अजित पवार

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना घडवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांचा तारखेनुसार 17 जून हा पुण्यतिथीचा दिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून जिजाऊंना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी शिवाजी महाराजांना घडवलं, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर महाराष्ट्र आजपर्यंत घडला, यापुढेही घडत राहील. जिजाऊ माँसाहेबांचं विचार, संस्कार आपल्याला नेहमीच बळ, प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

पुण्यात अजितदादांचीच ‘दादागिरी’, भाजपच्या ‘त्या’ निर्णयाला केराची टोपली

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, गेली साडेतीनशे वर्षे हा महाराष्ट्र जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांवरंच घडत आला आहे. माँसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला. राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचं बळ दिलं. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात आपला महाराष्ट्र आज आघाडीवर दिसतो, याचं मूळ जिजाऊ माँसाहेबांनी रुजवलेल्या स्वाभिमानाच्या विचारात, राष्ट्रासाठी त्याग करण्याच्या दिलेल्या संस्कारात आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मोठ्या शौर्यानं, ध्येयानं, संयमानं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांचे तेच गुण प्रत्येक आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला बळ देतील, मार्ग दाखवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!