Share

“कुठल्याही महिलेबद्दल अशा टीपणीचे समर्थन नकोच”, चित्रा वाघवरील ‘त्या’ मीम्सचा रुपाली पाटलांनी केला निषेध

Published On: 

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर बनवलेलं एक मीम्स सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यात चित्रा वाघ यांच्या वयक्तीक आयुष्यावर टिपणी केलेली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही महिलेबद्दल अशा टिपणीचे समर्थन होऊच शकत नाही. अशा शब्दात मीम्स बनवणाऱ्यांना चांगलीच चपराक देत त्यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर रुपाली पाटलांचे कौतुक होताना दिसून येत आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्यावर बनवण्यात आलेले ते मीम्सही रुपाली पाटलांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये रुपाली पाटील ठोंबरे लिहीतात, ‘सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेबद्दल अशा प्रकारे समाजमाध्यमात केलेल्या टिपणीचे समर्थन करता येणार नाही मग ती महिला कुठल्याही पक्षाची असो त्याचा निषेधच केला पाहिजे.’ असे ट्विट रुपाली पाटलांनी केले आहे.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर ४ लाखांची लाच मागितल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ५ जुलाई २०१६ रोजी किशोर वाघ यांच्या घराची झडती घेतली असता करोडोंची बेनामी संपत्ती आढळून आली होती. त्यानंतर १२ जुलाईपर्यंत किरोर वाघ यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्याने त्यांनी ही कारवाई थांबवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!