मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली आहे. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणाऱ्या एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या या कृतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भारत-चीन सीमेवर खिळे लावले असते तर चिनी सैन्य भारतात घुसलं नसतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
'दिल्ली सीमेवर लावलेले खिळे जर भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनचं सैन्य भारतात घुसलं नसतं' : संजय राऊत
मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबई सीमेवर अडवून त्यावरील भगवा ध्वज खाली उतरवणारे दुतोंडे आज मोदी सरकारला दिल्ली आणि चीन सीमेविषयी ज्ञानामृत पाजताहेत… pic.twitter.com/0Fok6ghRPt— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2021
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबई सीमेवर अडवून त्यावरील भगवा ध्वज खाली उतरवणारे दुतोंडे आज मोदी सरकारला दिल्ली आणि चीन सीमेविषयी ज्ञानामृत पाजताहेत…असं म्हणत राऊत यांना भातखळकर यांची चांगलेच झापले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- आता मिळावा फक्त एका मिस्ड कॉलवर LPG गॅस सिलेंडर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

