🕒 1 min read
पुणे : एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याने बुधवारी दुपारच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. एल्गार परिषदेत शरजील यानं हिंदू धर्मियांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादळ उठले होते. शरजीलला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केली होती.
उस्मानी हजर होण्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. उस्मानी याने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार या परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून भारतीय जनता पार्टी राज्यातील काही संघटनांनी या मुद्यावर आंदोलने करून उस्मानीच्या अटकेची मागणी केली होती. उस्मानी यावर भावना भडकावल्याप्रकरणी (भादंवि कलम 153 ए) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. या बाबत भारतीय युवा जनता मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे (28, रा. 404, अमृत गंगा सोसायटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
शरजील उस्मानीच्या हजेरीबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली असल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार’. असा जोरदार घणाघात करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 12, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेशचा शरजील महाराष्ट्रात आणि पुण्यात येऊन असे वक्तव्य करतो, याचा अर्थ काय? असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षाने केला होता. तर, सत्ताधारी पक्षाने आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरजील दोषी आढळला तर, त्याला शिक्षा होईलच, असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरजीलचे पोलिस ठाण्यात हजर होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- विश्वासघात हा या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे; पडळकरांचा दांडपट्टा सुरूच
- प्रसिद्ध वाहन कंपनी बीएमडब्ल्यूनंतर ऍपलची देखील भारतात उत्पादन सुरु करण्याची घोषणा
- चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात नवा ‘मलिंगा’
- आरक्षण निर्णयाचा शासनावर दबाव असल्यामुळे परीक्षा लांबणीवर
- माझ्यासोबतचे अंदोलक लादेन समर्थक होते का?, गोपीचंद पडळकरांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

