Share

प्रसिद्ध वाहन कंपनी बीएमडब्ल्यूनंतर ऍपलची देखील भारतात उत्पादन सुरु करण्याची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली: नुकतेच जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी पहिली मेड इन इंडिया असेम्बल्ड कार एम ३४० आय ड्राईव्ह लाँच केली असून तिची किंमत आहे ६२.८० लाख रुपये. चेन्नई प्रकल्पात ही कार उत्पादित करण्यात आली. भारतात उत्पादन झाल्याने तिची किंमत कमी आहे असे समजते.

त्यांनतर आता जग प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ऍपलने देखील आपल्या आयफोन १२ चे उत्पादन भारतात सुरु करत असल्याची घोषणा गुरुवारी केली गेली आहे. यासंदर्भात स्थानिक ग्राहकात जगातील दोन नंबरच्या सर्वाधिक मोठ्या स्मार्टफोन बाजारात म्हणजे भारतात आयफोन १२ चे उत्पादन अभिमानाची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हे उत्पादन कुठे केले जाईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. पण तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीच्या तामिळनाडू प्रकल्पात हे उत्पादन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अमेरिका चीन व्यापारी युद्धामुळे ऍपलने त्यांची उत्पादने चीन बाहेर अन्य देशात करण्याचा निर्णय घेऊन तश्या हालचाली सुरु केल्या आहेत. २०१७ पासून ऍपल भारतात आयफोन उत्पादन करत असून व्हीएतनामी कंपनी विस्ट्रोनच्या माध्यमातून हे उत्पादन केले जात आहे. फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि पेगाट्रोन मिळून पुढील पाच वर्षात भारतात ९० कोटी डॉलर्स किंमतीचे आयफोन उत्पादन करणार आहेत.

भारत सरकारने ६.७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या स्मार्टफोन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी वरील उत्पादन मदतगार ठरेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले भारताला मोबाईल आणि सुटे भाग हब बनविण्याची घोषणा सरकारने केली होती आणि त्यामुळे अनेक जागतिक कंपन्या भारताकडे आकर्षित झाल्या आहेत. याचा फायदा रोजगार वाढीसाठी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!