Share

‘गांधी आणि वाड्रा यांनी तिजोरीचे दार थोडे किलकिले केले तरी कशाचीच गरज पडणार नाही’

Published On: 

मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधून परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना

त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला आहे.याबाबत भातखळकरांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, 2G, 3G तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी तिजोरीचे दार थोडे किलकिले केले तरी कशाचीच गरज पडणार नाही अशा शब्दात त्यांनी चव्हाणांच्या सूचनेची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. ही समाधानाची बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा, असे देखील ट्विट चव्हाण यांनी केले होते.

बच्चू कडू पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन करायला गेले आणि…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!