Share

पिंपरी-चिंचवडमधून परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना

Published On: 

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात हजारो मजूर परराज्यातून कामासाठी आलेले आहेत. अनेक वर्षांपासून ते वास्तवास असून कोरोनामुळे त्यांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे ते आपल्या मूळ गावी जात आहेत. पिंपरी-चिंचवडमधून आज १२०० परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यांकडे रवाना झाले. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांच्या मार्फत त्यांना एसटी बसने राज्याच्या सीमारेषेवर सोडले जात आहे. या अगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

यातील ६०० परप्रांतीय मजुरांना छत्तीसगड, मध्यप्रदेश, नागपूर देवरी येथील सीमारेषेवर सोडण्यात येणार आहे. तर, सांगवी आणि हिंजवडी परिसरातील एकूण ५६० मजुरांना पुणे स्टेशन येथे पीएमपीएमएल बसने सोडण्यात आले असून तेथून त्यांना रेल्वेने रवाना केले जाणार आहे. हिंजवडी परिसरातील २५४, भोसरी एमआयडिसी ३४१ परप्रांतीय मजुरांना ते मूळ राहात असलेल्या राज्याच्या सीमारेषेवर सोडण्यात येणार असून आज वल्लभ नगर येथून बस रवाना झाल्या आहेत. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंठे, वल्लभनगर आगर प्रमुख पल्लवी पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरनार आदी उपस्थित होते.

सांगवी आणि हिंजवडी परिसरातील एकूण ५६० मजुरांना पुणे स्टेशन येथे पीएमपीएमएल बसने सोडण्यात आले असून तेथून त्यांना रेल्वेने सोडले जाणार आहे. हिंजवडी परिसरातील शेकडो मजूर मूळ गावी जाण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आज त्यांना रेल्वेने त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!