Share

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर भातखळकरांचा खोचक टोला, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. मात्र आता शिवसेनेचेच आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

‘मंत्रालयात दर बुधवारी काही विशिष्ट मंत्रीच दिसतात. जर लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा संपर्कच होत नसेल तर काय करावं? करोनाच्या स्थितीत समजून घेऊ शकतो. मग अजित पवार कसे काय रोज मंत्रालयात दिवसभर थांबतात? कसे लोकांना भेटतात? असा प्रश्न आमदार आशिष जयस्वाल यांनी अधिवेशनात केला. यावरच ‘मुख्यमंत्री महोदय, इथे लक्ष द्या…’ असा खोचक टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान ही आमदारांच्या मनातील खदखद असून कुठे तरी व्यक्त करावी लागेल. राज्य शासनात काम करणारे लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर सरकारने किमान बुधवारी सर्व मंत्र्यांना मंत्रालयात उपलब्ध राहण्यास सांगावं अशी विनंतीही आमदार आशिष जयस्वाल यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!