Share

आगी पासून वाचण्याचे प्रयत्न अखेर निष्फळ; १९ व्या मजल्यावरून एकाचा पडून मृत्यू

Published On: 

मुंबई : मुंबईतील करी रोड येथील अविघ्न पार्क या ६० मजली रहिवासी इमारतील १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. १९ व्या मजल्यावर ही आग लागल्याचे समजते आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या आगीचे लोण खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसत आहे.

जेव्हा ही आग लागल्याचे समजले तेव्हापासून इमारतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरवैरा पळू लागले. दरम्यान १९ व्या मजल्यावरून एक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी बालकनी मधून खाली उतरण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा खाली पडून दुर्देवी मृत्यु झाला. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अरुण तिवारी असे मृत व्यक्तीचे नाव होते.

दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १५ अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून होईल त्या प्रकारे आग विझविण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. झालेल्या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदत कार्यामध्ये त्या मार्गदर्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. अनेक हाय प्रोफाइल लोक आणि बडे व्यापारी या इमारतीत राहतात. या आगीत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. या इमारतीत किती लोक अडकले आहेत हे सुद्धा अद्याप कळू शकलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!