Share

‘…तर हार्दिकच्या जागी दुसऱ्या फलंदाजाचा विचार करायला हवा’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे, या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर यांनी हार्दिक पंड्याबद्दल मत व्यक्त केले आहे. प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद अमीरने सांगितले की, ‘हार्दिकला प्लेइंग इलेव्हनचा भाग असावा की नाही? हार्दिक गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळेच त्याच्यावर संघात फलंदाज आणि फिनिशर म्हणून चर्चा होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्येही हार्दिक मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करू शकला नाही आणि त्याचा फलंदाजीचा फॉर्मही विशेष नाही. जेव्हा मोहम्मद आमिरला हार्दिक पंड्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘जर हार्दिक गोलंदाजी करतो, तर कोणीही संघात त्याचे स्थान घेऊ शकत नाही, पण जर तो गोलंदाजी करत नसेल तर मला वाटते की आणखी एका फलंदाजाला टीम इंडियाने संघात संधी दिली पाहिजे.

हार्दिक पंड्याला दोन्ही सराव सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकला टी -20 विश्वचषकात फिनिशर म्हणून समाविष्ट केल्याची सतत चर्चा आहे, तर शार्दुल ठाकूर मध्यम वेगवान अष्टपैलू म्हणून टीम इंडियाचा भाग आहे. शार्दुलने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) चमकदार कामगिरी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!