मुंबई : क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. त्याची मी उद्या पोलखोल करणार आहेच, भाजप नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले?; असा सवालही मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या या आरोपाला आता भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ड्रग्स प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारचा प्रयत्न आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपांना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार प्रयत्न करत आहे का? या प्रकरणी देशाची युवा पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपांना राजकीय संरक्षण नको, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. आरोपी हा कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे. ड्रग्स प्रकरणात संशयाचं धुकं तयार करुन त्यातून आर्यन खान याला सोडवता येईल का, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि नातेवाईंकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याबाबत विचारलं असता तपास यंत्रणांचा त्यांचं काम करुन दिलं पाहिजे. त्यांच्या कामात हस्तक्षेप नको, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीपुढे महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, संघर्ष करणं पवारांची खासियत; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ज्यांच्या हाती देशाची सत्ता त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्थाच नाही- शरद पवार
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

