Share

वैजापूर तहसीलमधील कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

वैजापूर : वैजापूर येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून कार्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान सध्या या कर्मचाऱ्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

अव्वल कारकून मच्छिंद्र सुर्यभान उगले ( वय ५५) असे विषारी औषध प्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकून मच्छिंद्र उगले गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास कार्यालयात आल्यानंतर स्वतःशीच बोलू लागले. काही क्षणातच त्यांनी खिशातून विषारी औषध प्राशन केले. कार्यालयातीलच कोतवाल भांडे यांनी बघितल्यानंतर त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उगले यांनी औषध प्राशन केले होते.

या घटनेनंतर कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेमुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान उगले यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

परंतु असे असले तरी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची तहसीलदार राहूल गायकवाड यांनी पुरवठा विभागातून मका खरेदी केंद्रावर नियुक्ती केली होती. परंतु उगले यांना ही नियुक्ती मान्य नव्हती. असाही एक सूर कर्मचाऱ्यांमधून ऐकावयास मिळत आहे. दुसरीकडे त्यांना मधुमेह असल्यामुळे त्रास होत होता. त्यामुळे ते २१ व २२ जून रोजी सुटीवर असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!