सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी “धर्माच्या नावानं देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे” वक्तव्य केले आहे. तसेच शरद पवारांनी आपल्याला धर्मांध शक्तीच्या विरोधात लढाई करावी लागणार असल्याचे देखील सांगितले.
हजारोंच्या संख्येत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी पुन्हा हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे.
दरम्यान, कोण व्यवसाय चांगला करत असेल तर तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी व्यवसाय करु शकतो. पण हा अमुक एका धर्माचा म्हणून त्याच्याकडून माल घ्यायचा नाही अशी भूमिका देश पुढे घेऊन कसा जाईल? असाही प्रश्न शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. कर्नाटकमध्ये अल्पसंख्याकांच्या दुकानातून माल खरेदी करु नका असा काही संघटनांनी फतवा काढला. या मुद्यावरुन पवारांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या –


