🕒 1 min read
औरंगाबाद: प्रेयसीने नकार दिल्याने तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी नक्षत्रवाडी येथे घडली आहे. आकाश कोळेकर, असे मृत तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट स्टेटसला ठेवली होती. हे स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच त्याने नक्षत्रवाडी येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव संपवला.
नक्षत्रवाडीतील आकाशचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्या मुलीने त्याच्या सोबतचे असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे आकाश प्रचंड तणावाखाली आला होता. आणि या तणावात येऊनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मित्रांच्या सांगण्यावरून तिने आकाश सोबतचे प्रेम संबंध तोडले असल्याचा संशय आकाशला होता. आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये त्याने असं म्हणलं आहे की, लोकांचे ऐकुण ती मला नेहमी टेन्शन द्यायची. त्यामुळे मी खूप कंटाळलो आहे. म्हणूनच मी आता जीवन संपविणार आहे. तसेच तिच्याशी बोलल्यास जीवे मारु अशी धमकी देखील त्याला चौघांनी दिली आहे.
त्यामुळे आकाश आणखीनच तणावाखाली आला होता. यापैकी कोणालाही सोडू नका असे म्हणत त्याने त्या मुलीसह चौघांची नावे लिहून ती सुसाईड नोट थेट स्टेटसवर ठेवली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच त्याने स्वतःला संपवले. हा प्रकार निदर्शनास आल्यावर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे एच. वाय. घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ विहीरीच्या दिशेने धाव घेत आकाशचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असावे
- कोरोना रुग्णांकरीता ऑक्सिजन मिळवण्याचा प्रवास झाला सोप्पा!
- मोठी बातमी : कडक निर्बंधांना कोणी जुमानेना, आता निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता !
- कुस्ती स्पर्धांना परवानगी द्या, कुस्तीपटूंना आर्थिक मदत देण्याची मागणी
- ‘आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

