Share

पैठणमध्ये शिवसैनिकावर हल्ला, शहरात तणावाचे वातावरण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पैठण येथील संत नगर मध्ये दोन गटा तील व्वद मिटविण्यासाठी गेलेल्या युवका वर चार ते पाच युवकांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे भांडणे मिटविणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून शहरातील वातावरण तणाव निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर विलास अडसूळ रा नारळा वय 42 हे रात्री संत नगर व नारळा येथील दोन गटात काही कारणामुळे वाद झाला होता.

झालेला वाद मिटविण्यासाठी अडसूळ हे संत नगर येथे गेले असता जालिंदर अडसूळ यांना कांही अज्ञात युवकांनी पाठीमागून येऊन काही कळ न्याच्या आतच तीक्ष्ण हत्याराने पोटात,पाठीवर, छातीवर वार करून अडसूळ यांना गंभीर जखमी केले . यावेळी संत नगर येथील कांही युवकांनी त्याना पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैधकीय अधिकारी डॉ खिल्लारीकर यांनी अडसूळ यांना तपासून उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद च्या घाटी दवाखान्यात पाठविले. रात्री संतनागर व नारळा येथे युवकांनी पैठण पोलीस ठाण्या समोर प्रचंड गर्दी केली होती.

रात्री उशिरापर्यंत जखमी जालिंदर अडसूळ यांचा लहाना भाऊ संदीप अडसूळ याची पोलीस ठाण्यात तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू होती. जालिंदर अडसूळ यांच्यावर सात ते आठ जणांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्या चे तक्रारदार संदीप अडसूळ यानी सांगितले असून यामध्ये एका महिलेचे ही नाव असल्याचे कळते. सादर घटनेचा तपस डी वाय एस पी भामरे यांच्या मार्गदर्शना खाली पोनि किशोर पवार हे करीत आहेत. असे असले तरी शहरातील वातावरणात प्रचंड तणाव असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!