Share

पंजाब मधील आप पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर हल्ला

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील ५ राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यापासून, या ५ राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यात विधानसभेसाठी निवडणूका फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. तर या पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.

सध्या या पाच राज्यात निवडणुकांचा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू झाला आहे. आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे, त्यातच आज पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि विद्यमान लोकसभा खासदार भगवंत मान यांच्यावर आज हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे पंजाब राज्यात सर्वच ठिकाणी खळबळ माजली आहे.

या हल्ल्यामुळे भगवंत मान यांच्या चेहऱ्याला सुद्धा इजा झाली आहे. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच गर्दीतून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला असून त्यात मान हे जखमी झाले आहेत. भगवंत मान यांच्या चेहऱ्यावर व डोळ्याला मार लागल्याचे सांगण्यात येत असून त्यांना गंभीर इजा झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत मान हे दुपारी अटारी परिसरात आगामी निवडणुकीचा प्रचार करायला आले असताना तिथे गर्दीत उभ्या असणाऱ्या एकाने भगवंत मान यांच्यावर दगड भिरकावला त्यात भगवंत मान यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, या हल्ल्यानंतर त्यानं स्थानिक रुग्णालयात उपचाराकरता नेण्यात आले आणि किरकोळ उपचार झाल्यावर त्यांनी आम आदमी पक्षाच्या प्रचारास पुन्हा सुरुवात केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!