Share

बीडमध्ये झाले खाकी वर्दीतील देव माणसांचे दर्शन…

Published On: 

बीड : ऊन, पाऊस, वादळ असो किंवा सण खाकी वर्दीतील पोलिस नेहमीच बंदोबस्तासाठी तत्पर असतात. सणासुदीला एक दिवसाचा बंदोबस्त, तर गणेशोत्सवातील 10 दिवसांचा बंदोबस्त. निवडणुकीतील मर्यादित काळासाठी बंदोबस्त पोलिसांच्या पाचवाली पुजलेला आहे. मात्र, कोरोना विषाणूशी पोलिसांचा काडीचाही संबंध नाही. मात्र, देशात लॉकडाउन झाले आणि बंदोबस्तासाठी पोलिसांना ऑर्डर दिला. हा कोरोनाच्या काळातील बंदोबस्त म्हणजे पोलिसांच्या आयुष्यातील यातनांची यात्राच आहे.

बंदोबस्तादरम्यान राज्यात अनेक पोलिसांना कोरोना’शी लढताना आहुती द्यावी लागली. तरी हातात काठी घेऊन कर्तव्यात कसूर करत नाही. कधी कोण कोरोनाबाधित असेल हे खाकीला माहिती नाही. मात्र, रस्त्यावर हातात काठी घेऊन नाकाबंदी करणे, येणाऱ्या प्रत्येकाला थांबवणे, कुठे जाता, कशासाठी जाता, असे संवाद साधत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनी वारंवार घरून निघू नका, संचारबंदी आहे, असे तेच तेच सांगणे नाकीनऊ आणणारे ठरते. मात्र, नेहमीच डोक्यात आग घेऊन मिरवणाऱ्या पोलिसांचा नागरिकांशी संवाद साधताना संयम दिसून येत होता.

‘मी पुन्हा येईल’ असं म्हणाले आणि न आल्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेत – रामदास कदम

इतकच काय तर येणाऱ्या पावसाळ्याची तयारी देखील पोलीस करू लागलेत. अशीच खाकीतील माणूसकी बीडच्या छ.शिवाजी चौकात पाहायला मिळाली. बीडच्या छ.शिवाजी चौकात एक आजीबाई पाल टाकून राहतात. पाऊस आल्यानंतर पालात पाणी जाऊ नये,यासाठी वाहतूक शाखेचे महादेव कोकणार,शिवाजीनगर ठाण्याचे गणेश परजने यांनी पालाची बांधाबांध करून दिली. या संवेदनशीलतेची पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन त्यांना 5000 रु बक्षीस जाहीर केले आहे. खाकी वर्दीतील या देव माणसांना ‘महाराष्ट्र देशा’चा कडक सॅल्युट…

अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे यावे – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!