अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राच्या या अनपेक्षित निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन निर्यात बंदीच्या निर्णयामुळे पूर्णतः कोलमडून पडले असून त्यांना जे काही थोडेफार पैसे मिळणार होते ते देखील आता मिळणार नाहीत. स्व.अटलजींचे सरकार कांद्याच्या दरामुळे पडले होते ते आठवा, आणि कांद्यावर लादलेली निर्यात बंदी तात्काळ हटवा. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष व गेवराई पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी व्यक्त केले आहे.
पूजा मोरे पुढे म्हणाल्या की, मार्चपासून शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. सरकारने हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकरच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असे पूजा मोरे म्हणाल्या.
ज्यावेळी कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतो, कांद्याचे भाव कोसळतात त्यावेळी केंद्र सरकार कधी अनुदान देते का? केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी, अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- कंगनाला भेटणारे राज्यपाल, कांदयासाठी शेतकरी पुत्रांना भेटणार का ? किसानपुत्राचं राज्यपालांना पत्र
- मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांचे ऐकले, मुख्याधिकार्यांच्या खर्चाच्या अधिकारात केली दुप्पट वाढ
- आंदोलनाद्वारे राज्य आणि केंद्र शासनाला धडकी भरवण्यासाठी मराठ्यांनो, सज्ज रहा
- कोरोनावर मात करत खासदार नवनीत राणा पोहचल्या संसदेत
- उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर अमरावतीत वादंग, एबीव्हीपीने केला दडपशाहीचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

