Share

आंदोलनाद्वारे राज्य आणि केंद्र शासनाला धडकी भरवण्यासाठी मराठ्यांनो, सज्ज रहा

Published On: 

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती संदर्भातील निर्णयामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजावर या निर्णयामुळे अन्याय झाल्याची भावना मराठा आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. अशात ‘कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक व शासनाला धडकी भरवणारे करण्यासाठी मराठ्यांनो सज्ज रहा’ असे आवाहन करीत कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी तयारी सुरु केली आहे. यावेळी उग्र आंदोलन करण्यात येईल, असे तयारीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. परतूं जीवघेण्या कोरोनाचा कहर व संसर्ग लक्षात घेवून संसर्ग होऊ नये यासाठी रस्त्यावरील लढ्याची दिशा बदलावी लागणार आहे असं मत आंदोलकांनी व्यक्त केलं आहे.

यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील १२ तालूक्यासह, कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कागल, मुरगूड, कुरूंदवाड, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा, वडगांव, रशिवडे राधानगरी, बांबवडे, कोडोली इ. तालुक्यातील सकल मराठा समन्वयकाच्या बैठकीत जिल्हास्तरीय एकच निर्णायक भूमिका घेऊन पुन्हा राजर्षी शाहू महाराजाच्या विचारांचे आरक्षण मिळविण्यासाठी ताकदीने मराठ्यांचा एल्गार पुकारण्यासाठी सर्वांशी आॅनलाईन संपर्क सुरू केला आहे . योग्यवेळी उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/379386133070580/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!