चंद्रपूर : कोवीड संदर्भात प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजनांसाठी राज्यातील नगरपालिकांच्या मुख्याधिकार्यांना देण्यात आलेल्या खर्चाच्या अधिकारात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर 2020 रोजी नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पत्रव्यवहाराच्या व पाठपुराव्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
कोवीड 19 प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजनांसाठी राज्यातील क वर्ग नगरपालिकांना 5 लाख, ब वर्ग नगरपालिकांना 10 लाख व अ वर्ग नगरपालिकांना 15 लाखापर्यंत निधीला प्रशासकीय मान्यता देण्याचे व निधी खर्च करण्याचे अधिकार त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना देण्यात आले होते. सध्या परिस्थीती अतिशय गंभीर आहे, रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होते आहे. नगरपरिषदांच्या उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत.
कोवीडमुळे मालमत्ता कराची अपेक्षित वसुली होत नाही, नगरपरिषदांना स्वनिधी उपलब्ध नसल्याने परिस्थीती गंभीर होत चालली आहे. राज्यातील अनेक नगरपरिषदांकडे 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी अखर्चित आहे. या निधी अंतर्गत नगरपालिका मुख्याधिकार्यांना प्रशासकीय मान्यता व खर्चाबाबत जे अधिकार देण्यात आले आहेत. त्या निधीत दुपटीने वाढ करण्यात यावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली व त्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, मुख्याधिकार्यांना खर्चाच्या अधिकारात दुप्पट वाढ करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.
आता मुख्याधिकारी अ वर्ग नगर परिषद यांना 30 लाख, मुख्याधिकारी ब वर्ग नगर परिषद यांना 20 लाख, मुख्याधिकारी क वर्ग नगर परिषद तसेच नगरपंचायतींना 10 लाख या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आले आहे. या निधीच्या माध्यमातून कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करणे व या क्षेत्राचे व्यवस्थापन करणे, कोवीड केंद्राचे व्यवस्थापन करणे, कोविड उपाययोजनांच्या अनुषंगाने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणार्या सर्व उपाययोजनांवर होणारा खर्चदेखील सर्वसाधारपणे समाविष्ट आहे. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नगर परिषद क्षेत्रातील कोरोना नियंत्रणाच्या प्रक्रियेला अधिक बळ प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं महापाप – अजित पवार
- त्या कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले तर डिपॉझिट जप्त होईल – बच्चू कडू
- ‘या’ सहा सरकारी कंपन्यांना केंद्र सरकार लावणार टाळं!
- उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर अमरावतीत वादंग, एबीव्हीपीने केला दडपशाहीचा आरोप
- आंदोलनाद्वारे राज्य आणि केंद्र शासनाला धडकी भरवण्यासाठी मराठ्यांनो, सज्ज रहा


