🕒 1 min read
मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असून १९९० मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दरम्यान या चित्रपटाला करमाफी देण्यात यावी, (Tax exemption for the movie The Kashmir Files) अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.
दरम्यान आज पुन्हा एक ट्वीट करत भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “आम्ही काश्मीर फाईल्ससाठी करमाफी मागितली आहे, परंतु करंटे ठाकरे सरकार ती देणार नाही हेही निश्चित.”, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.
आम्ही काश्मीर फाईल्ससाठी करमाफी मागितली आहे, परंतु करंटे ठाकरे सरकार ती देणार नाही हेही निश्चित. pic.twitter.com/rsuBKwRvm4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 14, 2022
दरम्यान याअगोदरचेही भातखळकर यांचे ट्वीट चर्चेत आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “काश्मीर फाईल्स हा सिनेमा तिकीट बारीवर धोधो बिजनेस करतोय, पण तरीही काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारच्या दाबावामुळे हे सुरू आहे. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा हा सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू हे याद राखा.”
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आयपीएलमध्ये गोलंदाजीबद्दल हार्दिक पंड्याने केला खुलासा; म्हणाला…
“गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया
“…तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा दावा
देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

