Share

चक्क कोरोनाबाधित रुग्णच शिरला आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आणि मग…

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे अनेक जिल्ह्यांचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहेत. मात्र, राजेश टोपे आज अमरावती दौऱ्यावर असताना एक धक्कदायक घटना घडली आहे.

राजेश टोपेंनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद सुरु होण्याआधी कोरोनाबाधित रुग्ण पत्रकार परिषदेत शिरला आणि एकच धांदल उडाली. ३५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आरोग्य मंत्र्यांच्याच पत्रकार परिषदेत शिरल्याने प्रशासनाचे पुरते नाके नऊ झाले होते.

काय होती या युवकाची मागणी?

अमरावती शहरातील या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याने जिल्हा रुग्णालय गाठले, मात्र त्याला रुग्णालयात दाखल न केल्याने दाद मागण्यासाठी थेट राजेश टोपेंची पत्रकार परिषदच गाठली. आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भेटण्याचा त्याने आग्रह केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. विनवणी करून देखील त्याने आपला आग्रह सुरूच ठेवला होता. अखेर पत्रकार परिषद संपल्यावर त्याला रुग्णवाहिकेतून कोव्हिड रुग्णालयात नेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!