Share

धक्कादायक : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

Published On: 

पुणे : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. पुण्यात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबात स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून माहिती फिली आहे. मोहोळ यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील’. या आशयाचे ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोहोळ उपस्थित होते. या बैठकीला राज्यमंत्री दत्तामामा भरणे तसेच महापालिका आयुक्त आणि अनेक आजी-माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. त्यामुळे या नेत्यांची काळजी वाढली आहे.

दरम्यान आजच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!