हैदराबाद – कोरोनाने सध्या देशात हाहाकार माजविला आहे. शासन –प्रशासन सर्वतोपरी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र काही महाभाग शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र असे असताना देखील हैदराबादमधील एका व्यक्तीने वाढदिवसाच्या निमित्ताने जंगी पार्टीचे आयोजन केले होते. पण ज्याने ही पार्टी दिली होती, त्याचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एका सराफाने आपल्या वाढदिवसाच्या या जंगी पार्टीला १०० लोकांना आमंत्रित केले होते. दरम्यान शनिवारी त्या सराफाचे आणि वाढदिवसाला उपस्थित असणाऱ्या अन्य एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने उपस्थित इतर लोकांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे हैदराबादमधील हिमायतनगर परिसरात सोन्याचे दुकान आहे. या व्यक्तीच्या वाढदिवसाला ज्वेलर्स असोसिएशनमधील १०० जणांची उपस्थिती होती. वाढदिवसाची पार्टी दिल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या सराफाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आता हे सर्वजण सध्या आपली कोरोना चाचणी करण्यासाठी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात गेले आहेत.
गुरुपौर्णिमा विशेष : भक्ती शक्ती संगम – श्री रामदास स्वामी
ठाकरे सरकार मोफत उपलब्ध करून देणार कोरोनावरील ‘हे’ औषध ?
धक्कादायक : कोरोना प्रभावित यादीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

