Share

सध्या तरी मुंबई-पुण्यातील उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नको : सुभाष देसाई

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेक उद्योगधंदे आज बंद आहेत. त्यामुळे राज्याला येणाऱ्या महुसालातही लक्षणीय घट झाली आहे. यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरु केले आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मात्र मुंबई-पुण्यात सध्या उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नको असेही सुभाष देसाई यांनी म्हंटल आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन झोनमध्ये आणण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. परिणामी मुंबई, ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड हे भाग रेड झोनमध्ये असल्यामुळे आता उद्योग सुरु करण्याच्या बाबतीत येथील मंडळींनी घाई करु नये हा मुद्दा त्यांनी मांडला.एकिकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू पुन्हा वेग पकडण्याच्या प्रयत्नांत आहे, तोच दुसरीकडे राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

दरम्यान राज्यातील लघु उद्योगांना सावण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनामुक्त रत्नागिरी जिल्हा कोरोनायुक्त होणार का ? कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

केंद्र सरकार आर्थिक मदत न करता राज्य सरकारांवर दादागिरी नेमाने करत आहे : जितेंद्र आव्हाड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!