रत्नागिरी : नाही नाही म्हणता रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 52 झाला आहे. कारण मागच्या 10 दिवसांमध्ये तब्बल 45 कोरोनाचे रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने आढळून आले आहेत.
जिल्ह्याचा विचार करता मुंबई आणि पुणे या ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढता आहे. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तब्बल 46 कोरोनाचे रुग्ण नव्यानं आढळून आले आहेत. यातील जवळपास 42 रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. तर, 2 नर्सिंगच्या विद्यार्थिनींना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान राज्यतील कोरोना काही कमी होईचं नाव घेईना. काल दिवसभरात १२३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ५८७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल ४,७८६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात राज्यात ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २३ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. या ३६ मृत्यूंपैकी तब्बल १७ जणांचे वय साठहून अधिक होते. १६ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. तर, तीन जण ४० वर्षांखालील आहेत. आज ३६ मृतांपैकी २७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

