नागपूर: गेले ५ महिने कोरोनाने राज्यात कहर माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्राधिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेकांना कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून आले. तर, आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून प्रशासनाच्या व्यवस्थेतील कमतरता देखील समोर येत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष यांना देखील आता कोरोनाची लागण झाल्याने पावसाळी अधिवेशनाचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी, “गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,”असे त्यांनी सांगितले.
कंगना तर फक्त बेबी पेंग्विनला वाचवायचं कारण आहे ; नितेश राणेंचा घणाघात
सोबतच त्यांनी, “गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.” असे आवाहन देखील ट्विटरद्वारे केले आहे. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे महत्वाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलुन कालावधी देखील कमी करण्यात आला होता. आधीच दोन वेळा अधिवेशन अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलत ७ आणि ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
/2 = गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 4, 2020
मात्र, खुद्द विधानसभेचे अध्यक्षच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे, यासोबतच अनेक आमदार कोरोनाग्रस्त असल्याने आता हे अधिवेशन कसे पार पडणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कंगना राणावत कोण हे मी ओळखत नाही- प्राजक्त तनपुरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

