Share

औरंगाबाद: विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातून अनेकांची निवडणुक लढविण्याची तयारी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुंषंगाने भाजप आणि शिवसेनातर्फे तयारी सुरु करण्यात आली आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठांकडून युती होईल असे सांगत येत असले तरी अनेकांनी स्वतंत्र तयारी सुरु केली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपतर्फे अनेकांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहेत. बागडें यांच्या वयामुळे उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. पक्षाने सांगितल्यावर निवडणुक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त करीत पुन्हा बागडेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

गेल्या महिनाभरापासुन फुलंब्री मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहे. पाच वर्षांत बागडे यांनी मतदारसंघात चांगली कामे केली असून त्याच कामाच्या जोरावर पुन्हे ते निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र वयाचा विषय आल्यामुळे मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. यात बागडे यांचे समर्थक मानले जाणारे प्रदीप(आबा)पाटील यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा अनेकांकडे बोलून दाखवली. एवढेच नाही तर त्यांनी भाजपसाठी कार्य करणाऱ्या अनेक व्हॉटस्ऍप ग्रुपवर ‘मित्रानो फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहे, आपल्यला मदत व सहकार्य अपेक्षित आहे, आपला प्रदीप पाटील’ असा संदेश आणि स्वत:चा फोटो पाटील यांनी सर्व सोशल मिडीयावर शेअर करीत इच्छुक असल्याचे जाहिर केले आहे.

त्यासह 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या अनुराधा चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केल्यापासुन गावा-गावात जनसंपर्क वाढवत आहे. विधानसभेची तयारी सुरु केली आहे. यासह उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडेंनी मोर्चाच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चे बांधणी केल्याची माहिती समोर येत आहेत. यांच्यासह नामदेवराव गोडकर, शिवाजीराव पाथ्रीकर, सुहास शिरसाट व भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे, यांचेही नाव समोर येत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या गाळ्यात उमेदवारीची माळ पडेल, हे येणारा काळच सांगेल. सध्या मात्र, आपल्याला उमेदवारी मिळले या अशेने प्रत्येकजण आप-आपल्यापरीने मतदारसंघात तयारीला लागला आहेत. निवडणुकीत विरोधाकसमोर एमकमेकांची चुरस लागते. मात्र फुलंब्री मतदारसंघात सध्या आपल्याला तिकिट मिळेल यासाठी वरिष्ठांपर्यंत सेंटींग लावत आहेत. याच तयारीमुळे एकमेकांतील स्पर्धाही वाढीस लागत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!