मुंबई- 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? असा सवाल शिवसेनेने केंद्र सरकारला केला आहे.कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तिथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणं हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला टीका करण्यात आली आहे.
मेहबुबा मुफ्तीच कशाला फारुख अब्दुल्लाही बोलले होते, कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ, चीनच्या मदतीनं त्यांना 370 पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू करायचे आहे. तर केंद्रानं कठोर पावलं उचलायला हवीत. मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला हे दोन्ही काश्मीरमधले नेते ज्या पद्धतीनं तिरंग्याबाबत बोलतात हा तिरंग्याचा अपमान आहे. हा देशाच्या घटनेचा अपमान आहे. हा घटनेच्या स्वातंत्र्याचा अपमान असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत काश्मीरमध्ये पुन्हा 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत तिरंगा फडकावणार नाही, असं सांगणं हा 130 कोटी जनतेचा अपमान आहे.फारुख अब्दुल्ला देशाविरोधात बंडाची भाषा करत आहेत, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी. काश्मिरी पंडितबाबत हा केवळ प्रश्न नाही तर काश्मीर देशात आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. मोदी आणि अमित शाह असताना ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असंसुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत.
जर चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लादण्याचा प्रयत्न मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला यांच्याकडून होत असेल, तर केंद्र सरकार या नेत्यांवर कडक कारवाई करायल हवी. तसेच, जर काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकवताना कोणी विरोध करुन गोंधळ घालत असेल, तर तो राष्ट्रदोह असल्याचं मी मान्य करतो, असेही खासदार राऊत यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘कपबशी चोर’ काळ्या हीच तुझी लायकी ; राणेंचा राऊतांवर घणाघात
- अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात
- वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे खेळू शकलो याचा मला अभिमान!
- मराठा आरक्षणासंदर्भात ‘ठाकरे सरकार’ला अजिबात गांभीर्य नाही : गिरीश महाजन
- जळगावात भाजपची तातडीची बैठक, रक्षा खडसेंची दांडी…


