जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर एकूणच उत्तर महराष्ट्रातील भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यावरच एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या वतीने तातडीची बैठक आयोजित केली आहे. मात्र या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारला आहे.
भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित आहेत. अस असल तरी देखील एकनाथ खडसेनच्या सुनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी या बैठकीला दांडी मारली आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.
महत्वाच्या बातम्या
- धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही – नवाब मलिक
- कुटुंब नियोजनामुळे देशात हिंदुंच्या संख्येत घट; साध्वी प्रज्ञा सिंह यांनी उधळली मुक्ताफळे
- रोहतगी कोर्टात अनुपस्थित, अशोकराव जिथे कुठे असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करावं – संभाजीराजे
- पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक मिळवून पाकड्यांना हादरवून सोडणाऱ्या इरफान पठाणला वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!
- लातूर जिल्ह्यातील 11 कोविड केअर सेंटर रुग्ण नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

