Share

काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरूच; ५ दिवसांत ७ जणांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

काश्मीर : मागील काही दिवसांपासून काश्मीरमधील हत्यासत्र सुरूच आहे. ५ दिवसांमध्ये दहशदवाद्यांनी चक्क ७ जणांचा बळी घेतला आहे. गुरुवारी(७ ऑक्टो.) श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

सुपिंदर कौर आणि दीपक चांद अशी मृतांची नावे असून श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील मुलांसाठीच्या उच्च माध्यमिक शाळेत हे दोघे कार्यरत होते. दोघेही शिक्षक ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या तयारीत असतांनाच सकाळी ११:१५ वाजता दहशतवाद्यांनी या दोघांवर गोळीबार केला. त्यामुळे नजीकच्या परिसरात खबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात बोलतांना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले की,’काश्मिरात नागरिकांना, विशेषत: अल्पसंख्याकांना लक्ष्य करून होत असलेल्या हत्यांचा उद्देश भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि धार्मिक सलोखा बिघडवणे आहे. तसेच हा क्रौर्य आणि दहशतीचा खेळ आहे. मानवता, बंधुत्व आणि नीतिमूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, काश्मीरमधील सध्याच्या हत्यासत्राचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटतआहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, जम्मू- काश्मीर अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सजाद लोन, भाजपचे प्रदेश प्रवक्ते अल्ताफ ठाकूर आदींनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!