🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची 1982 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवाच मिळत आहेत. तळीरामांची मात्र या लॉकडाऊनमुळे चांगलीच गोची झाली आहे.
अखेर आसाम सरकारने दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आसाममध्ये 13 एप्रिलपासून दारुची किरकोळ विक्रिची दुकाने सुरू होतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी अशी अट सरकारने घातली आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या तळीरामांना आता आसाम सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. तर कोरोना आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारच्या तिजोरीत दोन पैसे जमा होणार आहेत.
Assam Government has allowed the opening of retail liquor outlets from April 13. The notification states that all liquor shops shall remain open from 10amto5:00pm on the permitted days, and follow social distancing. pic.twitter.com/4D6vpLvwaq
— ANI (@ANI) April 12, 2020
दरम्यान, लॉकडाऊनच्या या काळात तळीराम सगळ्यात अस्वस्थ आहेत. दारू मिळवण्यासाठी त्यांच्याकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी दारूचं दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या कुर्ला भागात दारूचं गोडाऊन फोडलं आहे. तसेच तळीरामांची तळमळ एवढी वाढली की त्यांनी चक्क यूट्यूबवर पाहून घरच्या घरीच दारू तयार केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
