Share

आशुतोष काळे यांना एकच काम, खोटे बोल पण रेटून बोल: विवेक कोल्हे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगरपालिकेने १४ व्या वित्त आयोगांतर्गत अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविलेला होता, या प्रस्तावामध्ये शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा समावेश केलेला असून सदरचा प्रस्तावास मंजुरी मिळवून निधी वर्ग होणे हा या प्रक्रियेचा भाग असल्याने यासाठी पाठपुराव्याची आवश्यकताच नसते. परंतु विद्यमान आमदार नेहमीप्रमाणे नगरपालिकेसाठी सहा कोटींचा निधी आणण्यासाठी मी पाठपुरावा केला असल्याचे सांगत आहे. विद्यमान आमदार खोटे बोल पण रेटून बोल हे एकच काम करत आहे. अशी टीका विवेक कोल्हे यांनी केली आहे.

१४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणारा निधी हा प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना मिळत असतो. त्यासाठी त्या संस्थेची ती जबाबदारी असते. त्यासाठी प्रस्ताव तयार करणे. त्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे या प्रक्रियेचा भाग असून त्यासाठी मिळणारे अनुदान हे सरकार कोणाचेही असो, लोकप्रतिनिधी कोणीही असो तरीही त्या त्या संस्थांना मिळत असते, असे विवेक कोल्हे म्हणाले.

१४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेला सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मीच मिळविला असल्याचा गाजावाजा विद्यमान आमदार करीत असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले. तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात विद्यमान आमदार धन्यता मानत असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, आ.संग्राम जगताप यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

दुनिया हिला देंगे हम: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स…

के.के.रेंजप्रश्नी पुढील आठवड्यात शरद पवार संरक्षण मंत्र्यांच्या भेटीला!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!