🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शहरासह उपनगरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच.एल.भराडे व एम.एस.देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. अहमदनगर शहरासह उपनगरात वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने महावितरण विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
अहमदनगर शहर व उपनगरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच विजेशी निगडित उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू असून सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास नगर शहरात तासन तास वीज पुरवठा खंडित होतो. याबाबत नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्या ठिकाणचे फोन उचलले जात नाही, असे आमदार जगताप म्हणाले.
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, गजेंद्र भांडवलकर, ऋषिकेश ताठे, दीपक खेडकर, सुमित कुलकर्णी, दादा दरेकर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
दुनिया हिला देंगे हम: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स…
के.के.रेंजप्रश्नी पुढील आठवड्यात शरद पवार संरक्षण मंत्र्यांच्या भेटीला!
राजकारण करा पण ते कोणत्याहि बाजूने सुडाचं नको ; केदार शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
