Share

के.के.रेंजप्रश्नी पुढील आठवड्यात शरद पवार संरक्षण मंत्र्यांच्या भेटीला!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याविरोधात सर्व गावकरी एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका मांडली. या प्रश्नावर पुढील आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याची माहिती आ.लंके यांनी दिली.

या भेटी दरम्यान आ.लंके यांनी पारनेर तालुक्यासह नगर आणि राहुरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका पवार यांच्यासमोर मांडली. विळद घाटाजवळील खारे कर्जुने परिसरात लष्कराचे के.के.रेंज हे सराव क्षेत्र आहे. तेथे सैनिकांना रणगाडा प्रशिक्षण दिले जाते. नगर, पारनेर व राहुरी या तिन्ही तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या क्षेत्राचे विस्तारीकरण होणार आहे.मात्र या विस्तारी करणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे, आ.लंके म्हणाले.

खा.पवार यांच्या भेटीनंतर पुढील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही शरद पवार यांनी आमदार निलेश लंके यांना दिली. यावेळी निघोजचे सरपंच ठकाराम लंके, वनकुटे गावचे सरपंच ॲड.राहुल झावरे, युवा नेते विजु औटी आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

श्रीरामपुर शहरात आठ दिवस लॉकडाऊन!

‘घात झाला! उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण स्थगित करून दाखवलंच’

दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते- नुपूर मेहता

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!